Thursday, March 26, 2009

The Bridge on the River Kwai



Movie: The Bridge on the River Kwai.
Language: English
Release Date: 1957.

द्वितीय महायुद्धावर आधारीत अप्रतीम चित्रपट.
ह्याची कथा म्हणजे एका ब्रिटीश सैन्य्तुकडीला जपानी सैन्याने युद्धकैदी म्हणून पकडले असते.
अशा परीस्थीतीमधे सैन्याच मनोधैर्य टिकवून, शिस्त कायम ठेवून कर्नलने (कर्नल निकल्सन)
केलेले कर्तव्य ह्यावर हा चित्रपट आधारीत आहे.

कर्नल निकल्सन म्हणजे "स्टार वॉर्स" सारखा प्रसिद्ध चित्रपट
आपल्या अभिनयाने गाजवणारे सर अलेक गिनेस.

द्वितीय महायुद्धासारख्या मोठी पार्श्वभूमी असलेल्या ऐतिहासिक घटनेच्या गर्भात
काही प्रसंग छोटेसेच असले तरी आपला ठसा उमटवून जातात.


एक प्रसंग सांगतो :

जपानी सैन्याला एक पूल बांधायचा असतो.
त्यात अनेक अडचणी येत असतात.
कर्नल निकल्सन जपानी सैन्याला पूल नीट
बांधण्यासाठी मदत करण्याचे ठरवतो.
त्याचे इतर अधिकारी ह्याला विरोध करतात.
त्यावेळी त्याच्या तोंडी जे वाक्य आहे ते अप्रतिम आहे. तो म्हणतो

"One day the war will be over and I hope that the people
who would use the bridge will remember how it was built and who built it.
NOT A GANG OF SLAVES BUT SOLDIERS! BRITISH SOLDIERS Even in captivity!"

.

0 comments: